राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काळी उद्योगधंद्यांना अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी. सोशल डिस्टन्सींग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट. कामगारांची राहण्याची व दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणे बंधनकारक. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.
राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
- 'कोरोना कोविड 19' या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले 'लॉक डाऊन' मधून बांधकाम क्षेत्राला काही अटींसापेक्ष काही प्रमाणात सूट देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.
- यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कंटेनमेंट झोन' वगळून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, ही परवानगी काही अटींसापेक्ष राहणार असून अटींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास सदर परवानगी तात्काळ रद्द केली जाणार आहे. या अटींमध्ये प्रमुख्याने खालील अटींचा समावेश आहे:
- बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यास महापालिकेच्या विकास नियोजन खात्याच्या प्रमुख अभियंता यांच्याद्वारे यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, अशाच प्रकल्पांना 'लॉक डाऊन'मधून काही अटींसापेक्ष सूट देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
- वरील अटींनुसार सूट देण्याची कार्यवाही प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.
- प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरुन कामगार आणण्यास परवानगी नसेल. महापालिका क्षेत्रात उपलब्ध झालेल्या किंवा उपलब्ध असणाऱ्या कामगारांकडूनच काम करवून घेणे आवश्यक.
- बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या राहण्याची, स्वच्छतेची व इतर आवश्यक गरजांची व्यवस्था ही त्याच ठिकाणी करणे बंधनकारक आहे.
- बांधकाम ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांना अन्नधान्य व पाण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सदर ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक.
- कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी नियमितपणे करवून घेणे. तसेच त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास आवश्यक ते औषधोपचार करणे.
- बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करण्यासह मुखावरण (मास्क) नियमितपणे वापरणे बंधनकारक.
- 'कंटेनमेंट झोन' मधील बांधकामांना वरील नुसार परवानगी देण्यात येणार नाही.
- वरील तपशीलानुसार महापालिकेद्वारे देण्यात आलेली बांधकाम सुरू करावयाची परवानगी ही काही अटींसापेक्षा देण्यात आली असून सदर अटींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास सदर परवानगी तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.
वरील व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वरूपाचे प्रकल्प, रस्ते व पूल विषयक दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, पाणी पुरवठा विषयक कार्ये, पावसाळापूर्व कामे इत्यादी कामांशी संबंधित बांधकामांना देखील 'लॉक डाऊन'मधून काही प्रमाणात सूट देण्यात येत आहे. तथापि, ही सूट देखील काही अटींसापेक्ष देण्यात येत असून त्यामध्ये 'कोरोना कोविड 19' बाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे परिपूर्ण पालन करण्याच्या अटीचा प्रामुख्याने समावेश आहे.
Kolhapur PPE Kit | इचलकरंजीमध्ये सर्व निकष पाळून पीपीई किटची निर्मिती