बीड : दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या शेतकर्‍यांना, गेल्या वर्षी पडलेल्या पावसान कसबस तारलं होत. दुष्काळ आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू असतानाच, नेमक्या वेळी कोरोना सारख्या महामारीने जगाला घेरलं. त्याचा सर्वाधिक फटका कष्टकरी शेतकर्‍यांना बसतोय. बाजारफेठा आणि कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतातचं माल सडून जात आहे. यावर एका शेतकऱ्याने उपाय काढला आहे. फळविक्रीसाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात खरबूजाची विक्री केली आहे. भाव जरी मनासारखा मिळत नसला तरी संपूर्ण नुकसानापेक्षा याने शेतकऱ्यांना आधार मिळत आहे.
अचानक ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे फळ बागायतदार शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. खरबूज आणि टरबूज विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने पांगरी गावच्या एका तरुण शेतकर्‍याने सोशल मीडियाचा वापर करून एक एकरवरील खरबूजाची विक्री सुरू केली आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून बूकिग करून घरपोच खरबूजाची विक्री केली जात आहे. मात्र, 40 रुपये किलोच्या खरबूजाला आता 15 रुपये किलोचा भाव मिळत आहे. सध्या शेतकर्‍यांच्या शेतात मोसंबी, टरबूज, खरबूज, गाजर, भेंडी, फुल कोबी यासारखा भाजीपाला आणि फळपीक विक्रीवाचून सडून जात आहेत. दरवर्षी यासारख्या नगदी पोकटून शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात. मात्र, यावर्षी शेतकर्‍यांना मिळेल त्या कवडीमोल भावाने आपल्या शेतातील माल विकवा लागत आहे. त्यातच आता लॉकडाऊनची तारीख वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहील आहे.


राज्यातील ग्रीन,ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंद्यांना परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना सोशल मीडियाचा आधार
उन्हाळ्याच्या दिवसात पपईला देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे पांगरी गावच्या विष्णु खेत्रे यांनी सत्तर हजार रुपय खर्च करून चार एकरावर पपईची लागवड केली. मात्र, आता लॉकडाउनच्या काळात विक्रीसाठी त्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता झाडावरच पापाईचे फळ सडून जात आहे. अशीच परिस्थिति राहिली तर त्यांना बाग तोडून टाकावी लागणार आहे. नेहमीच या ना त्या कारणाने शेतकरी संकटाचा सामना करत असतो. मात्र, यातून मार्ग काढणं गरजेचे आहे. याही काळात सोशल मिडीयाचा चांगला वापर करून या शेतकऱ्याने खरबूज आणि टरबुजाची विक्री केली. त्याचा आदर्श या काळात शेतकऱ्यांनी समोर ठेवणे गरजेचे आहे.

Sanjay Kakde on Governor | राज्यपालांनी कटुता, सुडबुद्धी न बाळगता शिफारस मंजूर करावी : संजय काकडे