एक्स्प्लोर

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबीयांची मागणी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टानेही वारंनार आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढून घेण्याची 'हीच ती वेळ' आहे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी सोमवारी (14 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाला केली. यावर तसा रितसर अर्ज दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र अशाप्रकारे भर कोर्टात मागणी करुन याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आणि कुटुंबीयांनी स्वत:च्याच अडचणी वाढवून घेतल्या आहेत, याची जाणीवही खंडपीठाने करुन दिली. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टानेही वारंनार आपली नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दुसऱ्यां यंत्रणांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, तुमच्या कामात निदान थोडीतरी प्रगती दाखवा, या शब्दात हायकोर्टाने या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना समज दिलेली आहे. कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे गेल्या दीड महिन्यात याप्रकरणात फारसं काम करता आलं नाही, कारण या टीमलाही बचावकार्याचं काम करावं लागलं होतं. मात्र तरीही दाभोळकर आणि कलबुर्गी प्रकरणातील आरोपींचा ताबा मिळवून त्यांच्याकडून पानसरे हत्याकांडामागील सूत्रधारांची काही माहिती मिळतेय का?, याचा तपास सुरु असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं तर दुसरीकडे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीपात्रातून शोधून काढण्यासाठी सीबीआयला आणखीन दोन आठवडे हवेत अशी माहिती कोर्टाला देण्यात आली. मात्र 'या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची वाढीव मुदत संपण्यापूर्वी शोधकार्य संपवा' अशी आठवण हायकोर्टानं सीबीआयला करुन दिली. गेल्या महिन्यांमधील सुनावणी दरम्यान खाडीपात्रातील शोधकार्यासाठी किमान चार आठवड्यांचा अवधी आवश्यक आहे, अशी माहिती सीबीआयने हायकोर्टात दिली होती. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचे अवशेष आरोपींनी कळव्याच्या खाडित टाकल्याची माहिती आहे. या कामासाठी परदेशातील प्रशिक्षित डायव्हर्सची या कामात मदत घेतली जाणार आहे. कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉ गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट  2013 साली खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकांवर, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Marathi : मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका
मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget