Mumbai Coastal Road Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर (Coastal Road) आज (दि.4) कारचा अपघात झाला. कोस्टल रोड बोगद्यात गुरुवारी दुपारी हा अपघात घडला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान, अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोस्टल रोडच्या निर्मितीनंतर हा पहिलाच अपघात (Mumbai Coastal Road Accident) झाला असल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. मात्र अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 


काळ्या रंगाची टोयोटा  कार धडकली 


मिळालेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी कॉल बॉक्स (ECB) मधून एका व्यक्तीने कॉल केला की CP-5 जवळ बोगद्यामध्ये कार अपघात झाला आहे. लोकल ऑपरेशन मेंटेनन्स रूमने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील घटना तात्काळ तपासली आणि संबंधित विभागाला माहिती दिली. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा  कार धडकल्याचे पहायला मिळाले. यात धडकेमुळे कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मार्शलसह बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच टोइंग व्हॅनही बोलवण्यात आली. मार्शल्सने वाहतुकीवर नियंत्रित मिळवण्याचे काम केले. 


कारचे स्टेअरिंग सैल झाल्याने अपघात


कार चालकाच्या सांगण्यानुसार, कारचे स्टेअरिंग सैल झाल्याने हा अपघात (Mumbai Coastal Road Accident) घडला असल्याची त्यांनी माहिती दिली . यावेळी कारमध्ये दोन जण होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे बोगद्याच्या आत ऑइल मोठ्या प्रमाणावर पडले होते . हे मार्शल टीमने साफ केले आहे.


कधी झाले होते उद्घाटन ?


मुंबईतील कोस्टल रोडचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.  कोस्टल रोडचा प्रकल्प मुंबईकरांनी अतिशय महत्वाचा होता. मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने याची बांधणी करण्यात आली आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Prithviraj Chavan: प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करु नये, उद्या खरोखरच संविधान बदललं तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल