मुंबई : मध्य रेल्वेवर लोकल सेवेचा खोळंबा (Mumbai Local Train) झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण - ठाकुर्लीदरम्यान पेंटाग्राफ तुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. डोंंबिवली ते कल्याण दरम्यान अनेक लोकलगाड्या थांबल्या आहेत.


29 मार्च रोजी पेंटाग्राफ तुटल्याने देखील लोकलचा खोळंबा झाला होता. आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी लोकलचा खोळंबा झाल्याची माहिती आहे.