एक्स्प्लोर

हा केवळ चहाचा नाही, आतिथ्य खर्च : मुख्यमंत्री कार्यालय

हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट असल्याचा दावा सीएमओने केला आहे

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराचा आधार घेत काढलेला निष्कर्ष पूर्णत: चुकीचा असल्याचा दावा सीएमओने केला आहे. हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे. यात वर्षनिहाय देयक दिल्याचा आकडा असून ते एकाच वर्षाचे दिले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही सीएमओकडून सांगण्यात आलं.

मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा, निरुपम यांचा आरोप

मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येत अलिकडे प्रचंड वाढ झाली आहे. या अभ्यागतांमध्ये सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देश-विदेशातील शिष्टमंडळे, विविध उद्योगसमुहांची प्रतिनिधी मंडळे, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या भेटींचा समावेश आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आयोजित विभागवार बैठकांची देयकं संबंधित विभाग देत असत. आता या बैठकांची देयकं मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जात आहेत. तसंच शासकीय विभागांच्या बैठकांची संख्याही वाढली आहे. त्याचप्रमाणे अतिथ्यखर्चात पुरवण्यात येणाऱ्या जिन्नसांच्या दरातही वाढ झाली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणारे विविध मान्यवर, वेळोवेळी भेटणारी शिष्टमंडळे, सर्व अभ्यागत, देश-विदेशातील मान्यवर तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांच्या भेटीदरम्यान करण्यात आलेले चहापान आणि अल्पोपहार याचा खर्चात समावेश असतो. तसेच बरेचदा या सर्व जिन्नसांचा पुरवठा केल्यावर त्यांची देयके तात्काळ सादर केली जात नाहीत. उशीरा सादर झालेली देयके पुढील आर्थिक वर्षांत येतात आणि ती देयके एकत्रितपणे अदा केल्यामुळेदेखील अशा खर्चात वाढ आहे, असा दावा सीएमओकडून करण्यात आला. काय आहे प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयात 2015-2016, 2016-2017 आणि 2017-2018 मध्ये चहा आणि अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाल्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी लक्ष वेधलं. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 2015-2016 साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर 57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च झाला होता. तो खर्च 2016-2017 मध्ये एक कोटी 20 लाख 92 हजार 972 रुपयांवर पोहचला. त्यानंतर 2017-2018 वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.
संबंधित बातम्या :
उंदीर घोटाळ्यावरुन विखे पाटलांची चौफेर टोलेबाजी
मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र
उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही?
मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण
पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget