एक्स्प्लोर
सलग तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्र्यांकडून नार्वेकरांच्या बाप्पाचं दर्शन
गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेण्याची ही तिसरी वेळ आहे. मीरा भाईंदर निवडणुकीनंतर युतीत तणाव वाढला असतानाही मुख्यमंत्र्यांनी यंदाही नार्वेकरांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले. आमदार नितेश राणे यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















