एक्स्प्लोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वर दाऊदच्या हस्तकाची धमकी; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वर दुबईवरुन दाऊदच्या हस्तकाची धमकी आली आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वर फोनवरुन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक खेरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक कसून तपास करत आहेत. यासोबतच या प्रकरणाची माहिती सायबर पोलिसांना देखील देण्यात आली आहे. हा कॉल नक्की दुबईवरून आला होता का? की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोणी खोडसाळपणा तर केला नाही ना? याची देखील माहिती घेण्यात येतं आहे.

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री परिसरात आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यामध्ये जलद कृती दलाच्या जवानांचे एक पथक आणि त्यांची मोबाईल व्हॅन देखील दाखल झाली आहे. यामध्ये 6 कमांडो आणि एका अधिकाऱ्याचा सामावेश आहे. या जवानांचे विशेष म्हणजे हे जवान अत्याधुनिक शस्त्रास्त्रासह सज्ज आहेत. यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग देखील देण्यात आले आहेत.

मातोश्री निवासस्थान हे शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान : गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई याबाबत बोलताना गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. मातोश्री निवासस्थान हे शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि या निवासस्थानाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे मी एक शिवसैनिक म्हणून बजावून सांगतो. या कॉलचा लवकरच छडा लावला जाईल व कॉल करणाऱ्याला धडा शिकवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

 मातोश्री वर निनावी फोन आला होता, मात्र... मंत्री अनिल परब यांची 'त्या' फोनबद्दल माहिती

मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही : परिवहन मंत्री अनिल परब परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचं त्यानं सांगितलं. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही. या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत सतत आढावा घेतला जातो आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून तपासाचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून त्यांना कठोर शासन करावे, अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या आहेत. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे अशी देखील माहिती दिली.

Anil Parab | मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत चौकशी सुरू, धमक्या देणाऱ्यांना सरकार सोडणार नाही - अनिल परब

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget