एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray Discharged : मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज; उद्धव ठाकरेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?

CM Uddhav Thackeray Discharged : मणक्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 22 दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज.

CM Uddhav Thackeray Discharged :  यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 22 दिवसांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी परतेल आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यामुळे (Cervical Spine Surgery) मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते.  

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याचं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर महत्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ. शेखर भोजराज यांनी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया केली आहे. 

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) HN रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधी वरिष्ठ आर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्यानं विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांवर फिजिओथेरपी सुरु झाली होती. 

पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शस्त्रक्रियेपूर्वी काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होत. तब्बल 22 दिवस ते रुग्णालयात होते. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती.  मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे त्यावेळी म्हणाले होते की, गेली सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.  आरोग्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांना नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Mumbai Students Morcha: मुंबईत पुन्हा विद्यार्थ्यांचा एल्गार! 9 ऑगस्टला भव्य रॅली काढणार, देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन, नेमकं कारण काय?
मुंबईत पुन्हा विद्यार्थ्यांचा एल्गार! 9 ऑगस्टला भव्य रॅली काढणार, देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Embed widget