मुंबई : राज्यात 1 मे रोजी एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सभा सुरु असताना मिस्टर कूल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र महाउत्सव कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. राज्यातल्या विविध अधिकाऱ्यांनी आपली कला सादर करावी, यासाठी ठाकरे सरकारने महाउत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत IAS अधिकाऱ्यांना देखील आपली कला या मंचावर सादर केली. या महाउत्सव प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस याचं नाव न घेता टोमणा मारला. "राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकच व्यक्ती गाते येतं, असं मला वाटत होतं," असं म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला.


या महाउत्सवात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी देखील आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सर्वांची मनं जिंकली. तर महाराष्ट्राची लोकगीतांची कला, पोवाडे तसेच विविध वाद्यांचा आवाज काढत वर्दीतल्या कलाकाराने सर्वांची दाद मिळवली. या महाउत्सवाचं उद्घाटन आणि सांगता सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 


महाउत्सवाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटंसं भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, "मनुकुमार श्रीवास्तव जेव्हा मुख्य सचिव झाले तेव्हा आदित्यने मला सांगितलं की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात." 


दिपाली सय्यद यांचा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा
मशिदींवरील भोग्यांच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "ऐ 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से !" असं ट्वीट त्यांनी केलं होतं. यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्या टीकेला एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं होतं. "फडवणीस साहेब योगी बनण्यासाठी आपल्या बायकोला सोडणार आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कल्याणमधील कार्यक्रमातही त्यांना अमृता फडणवीस यांचं नाव न घेता निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. नाहीतर पुन्हा येईन, पुन्हा येईन हे कायम स्वप्न राहिल." 


संबंधित बातम्या


घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये; दिपाली सय्यद यांची फडणवीसांवर टीका


योगी बनण्यासाठी फडणवीस बायकोला सोडणार आहेत का? दीपाली सय्यद यांचं वादग्रस्त वक्तव्य