Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 92 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी तीन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये रविवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 73 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 628 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,39,723 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 8739 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.008 टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 628 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 209 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 75 सक्रीय रुग्ण आहेत. नाशिक 10, अहमदनगर 14, रायगड 13 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 995 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 169 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. रविवारी राज्यात 169 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 995 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 172 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
संबंधित बातम्या