एक्स्प्लोर

विरोधकांच्या मनात काळंबेरं, पण मराठा आरक्षण देणारच : मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरुन विरोधक फारच आक्रमक झाले. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सरकार मराठा समाजाला दिल्याशिवाय राहणार नाही, असंही सांगितलं.

मुंबई : "विरोधकांच्या मनात काळंबेरं आहे, त्यांना समाजात भांडण लावायचं आहे. समाजात तेढ निर्माण व्हावी ही यांची इच्छा आहे," असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारच असा पुनरुच्चार केला. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरुन विरोधक फारच आक्रमक झाले. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सरकार मराठा समाजाला दिल्याशिवाय राहणार नाही, असंही सांगितलं. नियमानुसारच कार्यवाही कलम 14 आणि 15 दाखला देत राज्य सरकार नियमानेच कार्यवाही करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, "राज्य मागास आयोगाचा हा 52 वा अहवाल आहे. याआधीचे 51 अहवाल सभागृहात मांडलेले नाहीत. राज्य सरकारच्या वतीने या सभागृहात विधेयक मांडण्याआधी एटीआर मांडण्यात येईल, जो कायद्यानुसार आहे." "तसंच ओबीसी समाजाच्या 52 टक्के आरक्षणाला बाधा न आणता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे. राज्यात सध्या 52 टक्के आरक्षण आहे, 50 टक्के नाही. एसईबीसीचं आरक्षण जिवंत आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच विरोधकांवर निशाणा मात्र मराठा आरक्षणावरुन दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण अहवाल सादर करण्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "विरोधकांच्या मनात खोट आहे. त्यांना समाजात भांडणं लावायची आहेत. समाजात तेढ निर्माण व्हावं ही त्यांची इच्छा आहे. समाजाला विघातक ठरणारं कृत्य करु नका, अशी माझी हात जोडून विनंती आहे. पण तुम्ही जर राजकारण करत असाल तर राजकीय उत्तर आम्हालाही देता येतं. त्यांना राजकारण करु द्या, राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही." विरोधक मुस्लीम समाजाला भडकवत आहेत : मुख्यमंत्री "आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला नाही, त्यामधील पोटजातींना आरक्षण दिलं. मुस्लिम समाजातील 52 जातींना आरक्षण आम्ही दिलं. हे प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर शैक्षणिक आरक्षण वगळता इतर आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि निर्णय राखून ठेवला. आरक्षण देण्याआधी हे प्रकरण मागास आयोगाकडे पाठवून त्यांना मागास सिद्ध करावं लागेल. विरोधक फक्त मुस्लीम मतांचं राजकारण करत आहेत. ते मुस्लीम समाजाला भडकवत आहे," असा गंभीर आरोपही धनगर आरक्षणाचा अहवाल एटीआरसोबत मांडणार "धनगर आरक्षणाबाबतच्या अहवालाचा अभ्यास सुरु आहे. योग्य वेळी तो एटीआरसोबत मांडला जाईल. आदिवासी समाजावर गदा न येता धनगरांना आरक्षण देणार आणि केंद्राकडे शिफारशी पाठवणार," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. पाहा व्हिडीओ संबंधित बातम्या मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Embed widget