एक्स्प्लोर

सत्ता मिळो न मिळो मात्र, आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही: मुख्यमंत्री

मुंबई: ‘मुंबईत आम्हाला सत्ता मिळो किंवा न मिळो मात्र, आम्ही काँग्रेससारख्या पक्षासोबत जाणार नाही. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर त्यांना रोखणार नाही.’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. नगरपालिकांच्या निवडणुकानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आज भाजपनं मुंबईत सेलिब्रेशन केलं. त्यावेळी आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ‘भाजप लाटेत निवडून आला तर ती लाट विश्वासाची आहे. महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्ष सगळ्या पक्षांची एकत्रित बेरीज केली तर त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.  शहर असो वा गाव सगळ्यांनी भाजपवर विश्वास दाखवला.’ असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘आम्हाला सत्ता मिळो व ना मिळो, काँग्रेससारख्या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. कुणाला त्यांच्याबरोबर जायचं असेल तर जावं. काँग्रेसला जनतेने पराजित केलं. त्यामुळे भाजप विचारांची लढाई लढत राहील. पारदर्शी अजेंडावर तडजोड आपण करणार नाही. जे येणार नाही त्यांच्याशिवाय चालायचं. आपल्यासोबत ज्यांना यायचं आहे त्यांना आपण सोबत घेऊ.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणला. ‘मुंबईत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला. या निवडणुकीत सर्व समाज भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. कोण म्हणतं मराठी माणसाने मत दिल नाही? गिरगावात आपण निवडून आलो. गुजराती, मराठी, अल्पसंख्यांक, दक्षिण भारतीय सगळ्यांनी भाजपला मतं दिली.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मुंबईच्या महापौरपदाबद्दल योग्य वेळी भूमिका जाहीर केली जाईल. असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्यानंतर आज शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक शिवसेना भवनात झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवीन नगरसेवकांना महापौर मतदानाच्या दिवशी मतदानाची पद्धत कशी असते याची माहिती दिली गेली. संबंधित बातम्या: शिवसेनेनं महापौरपदासाठी काँग्रेसची मदत मागितली मात्र आमचा नकार: निरुपम शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Mumbai Goregaon Toilet death: शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Embed widget