मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युतीबाबतची भूमिका आता समोर आली आहे. मुख्यमंत्री युतीसाठी सकारात्मक होते. पण शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाने मुख्यमंत्री दुखावले गेले आणि नंतर त्यांनी ताठर भूमिका घेतली. अशी माहिती सुत्रांकडून समजते आहे.


युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली दिल्लीवारी:

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून सकारात्मक होते. दिल्लीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी अमित शाह आणि मोदी यांची भेट घेऊन युतीची परवानगी घेतली होती. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना 105 जागांवर युतीची हिरवा कंदीलही दाखवला होता.

अन् तिथेच मुख्यमंत्री दुखावले:

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकित युती करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपकडून चर्चेसाठी तीन नेते दिले गेले. पण शिवसेनेनं भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिला आणि मुख्यमंत्री तिथेच दुखावले गेले. मुख्यमंत्र्यांनी पक्षातील आमदार आणि मुंबई भाजपचं विरोध पत्कारुन युतीची भूमिका घेतली. पण शिवसेनेनं 60 जागांचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी ताठर भूमिका घेतली.

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला नाही:

आता युतीबाबत चर्चा करायची असेल तर शिवसेनेनं सुधारित प्रस्ताव द्यावा. हे मत मुख्यमंत्र्यांचं झालं. त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. म्हणून गेल्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून उद्धव ठाकरेंना संपर्क केला नाही.

'जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच'

युतीची चर्चा सुरु झाल्यावर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पारदर्शी अजेंडावर फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली नाही. आज उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी 'सत्ता हे साध्य नाही, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच.. पारदर्शी कारभार हा आमचा मूलमंत्र' हे ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या:

एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल?

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

'युती तुटल्याचं अतीव दुःख झालं', शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया 

शिवसेनेचे सर्व मंत्री बॅगा भरुन तयार आहेत: सुभाष देसाई

जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री