मुंबई: 'गुळाला मुंगळा जसा चिकटतो, तशी शिवसेना अजूनही सत्तेला चिकटून आहे. निवडणुकीसाठी युती तोडली खरी, पण सत्तेतून बाहेर पडण्याची सेनेत धमक नाही.' अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केली आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज युती तुटल्याच्या बातमीवर अतिशय खोचक अशी प्रतिक्रिया दिली. 'एवढी वर्ष एकत्र काम करणाऱ्यांची युती तुटली याचं मला अतीव दु:ख वाटतं.' असं पवार म्हणाले.

‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी घोषणा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भाजपची युती तुटल्याची घोषणा केली. ‘गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं.

संबंधित बातम्या:

एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल?

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

'युती तुटल्याचं अतीव दुःख झालं', शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया 

शिवसेनेचे सर्व मंत्री बॅगा भरुन तयार आहेत: सुभाष देसाई

जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री