एक्स्प्लोर

गडचिरोली नक्षलवादी हल्ला : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शरद पवारांची मागणी

सरकार नक्षलवाद्यांविरोधात ठोस पाऊल उचलण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारला पायउतार करण्याशिवाय पर्याय नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं.

मुंबई : गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहेत. यावरुन आता राजकारण तापू लागलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

नक्षलवादी हल्ला नित्याची गोष्ट झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर लहान मोठे नक्षलवादी हल्ले झाले आहेत. मात्र आजचा हल्ला गंभीर आहे. राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही, असा आरोप शरद पवारांनी केला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे. नक्षलवादी हल्ले सतत होत आहेत, याचा अर्थ मुख्यमंत्री आपली जबाबदारी पार पाडायला अपयशी ठरले आहेत. जी व्यक्ती सामान्य माणसांची आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीला या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

सरकार नक्षलवाद्यांविरोधात ठोस पाऊल उचलण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारला पायउतार करण्याशिवाय पर्याय नाही. आपण जवानांच्या हत्या बघायच्या आहेत का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.

गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील 25 जवान खासगी वाहनाने प्रवास करत होते. नक्षलींनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात त्यातील्या 15 जवानांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर जखमी आहेत.  स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.

शहीद जवानांची नावे

1. दयानंद ताब्रध्वज शहारे (भंडारा) 2. आग्रमण बक्षी राहाटे (यवतमाळ) 3.सर्जेराव एकनाथ खार्डे (बुलडाणा) 4. किशोर यशवंत बोबाटे (गडचिरोली) 5. संतोष देविदास चव्हाण (हिंगोली) 6. राजू नारायण गायकवाड (बुलडाणा) 7. लक्ष्मण केशव कोडाप (गडचिरोली) 8. शाहुदास बाजीराव मडावी (गडचिरोली) 9. नितीन तिलकचंद घोरमारे (भंडारा) 10. पुरणशाहा प्रतापशाहा दुग्गा (गडचिरोली) 11. प्रमोद महादेवराव भोयर (गडचिरोली) 12. तौशिब आरिफ शेख (बीड) 13. अमृत प्रभुदास भदाडे (नागपूर) 14. योगेश सिताराम हलामी (गडचिरोली) 15. अशोक जितरू वटटी (गडचिरोली)

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget