एक्स्प्लोर

मान्यवरांची बैठक संपली, आरक्षणासाठी कटिबद्ध: मुख्यमंत्री

मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. त्यानंतर ते बोलत होते.

मुंबई: मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीत मराठा समाजाच्या लघु आणि दीर्घ उपाययोजनावर चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनी आवाहन करण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. “या बैठकीसाठी  20 ते 22 मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाययोजना यावर चर्चा झाली. संयुक्त निवेदनाद्वारे म्हणणं मांडण्यात येणार आहे. मान्यवरांनी मोलाच्या सूचना दिल्या. तर आम्ही सरकारच्या योजना त्यांना सांगितल्या. निवदेनाद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहोत. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आलं”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे, उद्योजक बी.बी.ठोंबरे, अभिनेते सयाजी शिंदे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. मराठा आंदोलनांची कोंडी फुटावी आणि चर्चेतनं मार्ग निघावा या हेतूनं ही बैठक बोलावण्यात आली होती. “सर्व विचारवंतांसोबत चर्चा केली, सूचनांच्या नोंदी घेतल्या. मराठा आंदोलन सुरु आहे, त्याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं याबाबत चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये, आत्महत्या होऊ नये याबाबत आवाहन करण्यात आलं”  अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मान्यवरांची बैठक संपली, आरक्षणासाठी कटिबद्ध: मुख्यमंत्री बैठकीला कोण कोण उपस्थित?
  • डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत
  • नितीन चंद्रकांत देसाई, कला दिग्दर्शक
  • अमोल कोल्हे, अभिनेते
  • सयाजी शिंदे, अभिनेते
  • भैरवनाथ भगवानराव ठोमरे, उद्योजक
  • डॉ. सतीश परब, सुवर्ण कोकण संथा, शेतीपुरक उद्योजक
श्रीमंत शाहू महाराज अनुपस्थित मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला. 58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली दिसून येते. त्यात आधी मूक मोर्चे काढणाऱ्या आंदोलकांनी ठोक मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. संबंधित बातम्या मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजातील मान्यवरांसोबत मंथन   मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीस श्रीमंत शाहू महाराजांचा नकार 

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget