एक्स्प्लोर

विरोधकांच्या 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'च्या पोस्टरबाजीला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेले प्रश्न आमच्या कार्यकाळात निर्माण झाले नाहीत. विरोधक सत्तेत असताना त्यांच्या कार्यकाळात हे प्रश्न उपस्थित झाले आहे.

मुंबई :  हिवाळी अधिवेधशनाच्या पूर्वसंध्येला ठगबाजीचं चार वर्षे अशा बॅनरखाली विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना ठग संबोधलं होतं. विरोधकांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देतांना हा पोरकटपणा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गंभीर होण्याची गरज असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

विरोधकांनी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'चं पोस्टर तयार करत सरकारवर टीका केली. त्यामुळे मग मी काय 'गँग्ज ऑफ वासेपूर'ची पत्रकार परिषद झाली असं म्हणायचं का? अशी कोपरखळी विरोधकांना लगावली. विरोधकांकडे मुद्दे उरले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारे फिल्मी डायलॉग मारले जात असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेले प्रश्न आमच्या कार्यकाळात निर्माण झाले नाहीत. विरोधक सत्तेत असताना त्यांच्या कार्यकाळात हे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यांनी उत्तरे आम्ही आज देत आहोत. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही प्रभावीपणे उत्तरे दिलं असून पुढेही देत राहू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'ठगबाजीची चार वर्षे', विरोधकांची टीका

आमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत विरोधकांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'चे पोस्टर तयार केलं होतं. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ठगांच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.

बॅनरवर आमिर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला होता. शिवाय 'ठगबाजीची चार वर्षे' असे शीर्षक या पोस्टरला दिलं होतं. उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात तयारी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली.

भाजप आणि शिवसेनेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी अशी विविध शीर्षकं देत सरकारवर बोचरी टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget