एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मार्गात केबल, सुदैवाने दुर्घटना टळली

हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आलं, त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेला हेलिकॉप्टर त्रासाचा ससेमीरा कायम आहे. आज मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग सुरु होतं. मात्र हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आलं, त्यामुळे संभाव्य अपघात टळला. आज भाईंदर येथे एस.के स्टोन चौकीजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील घोडबंदर इथल्या वर्सोवा पुलाच भूमीपूजन, तसेच इतर विकास कामांचंही भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी हे दुपारी एकच्या दरम्यान मुंबई येथील एक कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने भाईंदरच्या सेवन इल्वेन शाळेत उतरणार होते. त्यावेळी शाळेच्या इमारतीतून दुसऱ्या इमारतीवर केबलची वायर गेली होती. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑप केलं. जर हेलिकॉप्टर खाली आलं असतं, तर हेलिकॉप्टरच्या पंख्यात वायर अडकून अनर्थ घडला असता. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते. याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आलं आहे. तर कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी मुंबईला रस्तेमार्गे रवाना होणं पसंत केलं. मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरचं विघ्न लातूर - 25 मे 2017 लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर काही क्षणातच कोसळलं.  अलिबाग - 7 जुलै 2017 हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला  नाशिक - 9 डिसेंबर 2017 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं भाईंदर - 11 जानेवारी 2018 हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑप केलं. संबंधित बातम्या :  मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलटच जबाबदार : एएआयबी जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं, नेमकं काय घडलं? लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget