एक्स्प्लोर

ती क्लिप माझीच, मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण क्लिप जारी

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

वसई: "पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर उतरली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते वसईत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनिती असा होतो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असं या क्लिपमधील शेवटचं वाक्य होतं. मात्र ते त्यांनी दाखवलं नाही. ते दाखवलं असतं, तर शिवसेना तोंडावर पडली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली. जी ऑडिओ क्लिप शिवसेनेने जारी केली आहे, ती संपूर्ण ऐका. जर त्या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळलं, मी दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई करा, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. साम-दाम-दंड-भेद म्हणजे कूटनिती आहे. समोरचा जसा वागेल, तसं वागा, जसा वार करेल, तसा वार करा, असं मी म्हणालो.  शिवसेनेने एडिट करुन ऑडिओ क्लिप दाखवली, असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वी जी बाळासाहेबांची शिवसेना होती, ती आताशिवविरोधसेना झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप सादर  मुख्यमंत्री काय म्हणाले? ज्यावेळी पराभव समोर दिसतो, त्यावेळी अशा स्तरावर जावं लागतं. जे वाचून दाखवलं, त्याच्या सत्य असत्याबद्दल मी बोलत नाही. पण ते अर्धवट दाखवलं. जे वाचून दाखवलं त्याच्या आधीचं आणि नंतरचं दाखवलं नाही. ते विशिष्ठ ठिकाणी थांबवण्यात आलं. त्यानंतर मी दोनच ओळी बोललो. ते दाखवलं नाही. त्या दाखवल्या असत्या तर शिवसेनेला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. मोडून तोडून, एडिट करुन क्लिप दाखवण्यात आली. साम दाम दंड भेद याचा उल्लेख त्या क्लिपमध्ये आहे. पण त्याचा अर्थ कूटनिती असा होतो. आपल्यावर ज्या प्रकारचा वार होईल, त्या प्रकारचं उत्तर द्या, असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे साम दाम दंड भेद मी बोललो असलो, तरी ते चुकीचं ठरलं नाही. त्याच्या पुढचं वाक्य दाखवलं असतं, तर सरकारमध्ये राहून आमची भावना काय आहे, हे तुम्हाला समजलं असतं. जो मुख्यमंत्री कार्यकर्त्यांशी फोनवर बोलताना इतकं भान ठेवतो, जो कार्यकर्त्यांशी कधीही चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. त्यांच्यावर तुम्ही आरोप करता. मी आता निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे. संपूर्ण क्लिप 14 मिनिटांची आहे. त्यात काही माझ्याबद्दल आक्षेपार्ह असेल, तर माझ्यावर कारवाई करा. पण ज्यांनी ही क्लिप एडिट करुन, लोकांना दिशाभूल केलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. ही ऑडिओ क्लिप मी पाहिली नाही. ती क्लिप बांदेकरांनी वाचून दाखवली. मी मनात म्हटलं, अरे मित्रा तू सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहेस. जनाची नाही तरी मनाची ठेव. सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहे , तोपर्यंत तरी खरं दाखवं. पूर्ण दाखव. पण तो छोटा माणूस आहे. आदेशाने काम करतो. नाव पण त्याचं आदेश बांदेकर आहे. देवेंद्र फडणवीसने आयुष्यात कधी आपली तत्वं सोडली नाहीत आणि सोडणारही नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जारी केलेली ऑडिओ क्लिप एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद... ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं.. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे चिंता करु नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. (शिवसेनेने इथवर दाखवली होती, त्यापुढची क्लिप मुख्यमंत्र्यांनी जारी केली) आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. परंतु आपल्या विरुद्ध जो कोणी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला सोडणारही नाही. ही मानसिकता या निवडणुकीत ठेवली पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget