एक्स्प्लोर

सिडकोचा लॉटरी विजेत्यांना दिलासा! घराच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क

सिडकोने दिवाळीपूर्वीचं लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा दिला आहे. घराच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

मुंबई : सिडकोच्या 14 हजार 500 घर विजेत्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घराच्या नोंदणीसाठी केवळ 1000 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मनसेच्या मागणीनंतर 'सिडको'कडून मुद्रांक शुल्काच्या निर्णयाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 'म्हाडा' नंतर आता 'सिडको'च्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क लागणार आहे.

सर्वांसाठी घरं या योजनेंतर्गत सिडकोने 2018-19 या वर्षी तब्बल 14 हजार 500 घरांसाठी लॉटरी काढली होती. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. या सर्व घरासाठी मुद्रांकशुल्क 1 हजार रुपये असावे अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली होती. त्यावेळी सभागृहात यावर सर्वानुमते चर्चा करून त्याबाबतचे एक परिपत्रक देखील काढण्यात आले होते.

मनसेच्या आंदोलनाची दखल

या परिपत्रकात सिडको महामंडळ, म्हाडा या विभांगाचा समावेश ही करण्यात आला होता. या घोषणेला जवळपास 1 वर्षे होऊन देखील 2018 साली काढण्यात आलेल्या लॉटरी धारकांना सिडकोकडून त्यांच्या घरांसाठी मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये करण्यात येईल अशा प्रकारची कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. यामुळे अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील घर विजेत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. हाच विषय समोर ठेऊन नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्ऱ्यांनी सिडकोचे संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या समस्यांबाबत माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

सिडकोने 2018-2019 मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी 14500 घरांसाठी काढलेल्या सोडत धारकांना 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारणे अपेक्षित आहे. परंतु, याबाबत कसलीही स्पष्टता सिडकोकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता सिडको प्रशासन सर्वसामान्य नागरिकांकडून घरांच्या नोंदणीसाठी लाखो रुपये मुद्रांक शुल्क आकारणार का हा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या कोरोना काळामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यात सोडत धारकांना हा भुर्दंड अन्यायकारी होत आहे. मुळात शासनाच्या 15 जुलै 2019च्या परिपत्रकानुसार या नागरिकांना 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारून घरांची नोंदणी करून देणे अपेक्षित आहे. परंतु, अद्याप याबाबत काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. यासोबतच जवळपास 1700 सोडत धारकांनी आर्थिक अडचणींमुळे हप्ते न भरल्यामुळे त्यांची सोडत रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय देखील मागे घ्यावा अशी विनंती मनसेने सिडको एमडीना केली होती. यावर आता लॉटरी विजेत्यांना सिडकोने दिलासा दिला आहे.

Navi Mumbai|सिडको कार्यालयावर विमानतळ प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन;CIDCOने आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget