एक्स्प्लोर

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश बंदी

गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे याला अटकेपासून हायकोर्टाचा तूर्तास दिलासा मिळाला आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजेला अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिलाय. ११ जूनपर्यंत निकाळजेला अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. पनवेल पोलीस स्थानकात निकाळजेविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अटकेपासून दिलासा देताना हायकोर्टानं पीडीत मुलगी राहत असलेल्या नवी मुंबईत निकाळजेला प्रवेश बंदी केली आहे. गरज असल्यास तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच दिपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश करता येईल.
साल २०१४ पासून तक्रारदाराशी संबंध असल्यानं संगनमतानंच शरीरसंबंध ठेवल्याचा याचिकाकर्त्यानी हायकोर्टात दावा केला आहे. साल २०१४ ते २०१८ या काळात सदर तरुणी आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. आपल्याशी लग्न न केल्यास या संबंधांची माहीती माझ्या पत्नीला देण्याची धमकीही ही तरुणी देत असे अशी माहीती निकाळजेनं कोर्टाला दिली. दरम्यान ती आपल्यासोबत एकदा काश्मिरलाही आली होती. असा दावाही निकाळजेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे.
कोर्टाने दीपक निकाळजेला अटक न करण्याचा आदेश दिला असला तरी त्याला नवी मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आला आहे. पीडीत मुलगी नवी मुंबईत राहत असल्याने कोर्टाने दीपक निकाळजेवर प्रवेश बंदी घातली आहे. नेमकं प्रकरण काय? लग्नाच्या आमिषाने दीपक निकाळजेने बलात्कार केल्याचा आरोप 22 वर्षीय युवतीने केला होता. आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत, तसंच शिक्षणाचा खर्च करु, असं सांगून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन निकाळजेने बलात्कार केला, असा आरोप नवी मुंबईत राहणाऱ्या एक युवतीने केला होता. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नवी मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केलं होतं. युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचं आमिष निकाळजेने दाखवलं. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. या मुलीने लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. पोलीस तक्रार करु नये म्हणून दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे. तरुणीने टिळकनगर पोलिसात 18 मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ 2 कडे वर्ग करण्यात आला होता. संबंधित बातम्या :

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेवर बलात्काराचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget