एक्स्प्लोर

बिल्डर हत्या प्रकरणात 16 वर्षांपासून फरार, छोटा राजनच्या हस्तकाला बेड्या

कमलेश जैन हा छोटा राजनचा खास हस्तक. 25 ऑक्टोबर 2003 रोजी बांधकाम व्यावसायिक राजेश चंद्रकांत पतंगेची त्याच्याच बिल्डींगमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती. हत्याप्रकरणात पोलिस 16 वर्षांपासून जैनच्या मागावर होते

वसई : बिल्डरच्या हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी आणि कुख्यात डॉन छोटा राजनच्या खास हस्तकाला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 16 वर्षांपासून फरार असलेल्या कमलेश जैनला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नालासोपारा युनिटने अटक केली. नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायिक राजेश पतंगे यांच्या हत्या प्रकरणात पोलिस त्याच्या मागावर होते. आरोपी कमलेश जैन हा छोटा राजनचा खास हस्तक. तो छोटा राजनच्या जमिनीचा व्यवहार बघत होता. 25 ऑक्टोबर 2003 रोजी बांधकाम व्यावसायिक राजेश चंद्रकांत पतंगेची त्याच्याच बिल्डींगमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज भागातील राधाकृष्ण अपार्टमेंटजवळ सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. आरोपींनी मिरा रोड येथील जमिनीच्या वादातून ही हत्या केली होती. या हत्येची सुपारी छोटा राजनला देण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 14 आरोपींचा सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. त्यापैकी दहा आरोपींना अटकही करण्यात आली होती. तर एका आरोपीचं मुंबईत एन्काऊन्टर करण्यात आलं होतं. यात सोळा वर्षांपासून फरार असलेला छोटा राजनचा खास हस्तक कमलेश जैनचंही नाव होतं. मात्र तो 16 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. जैन बोरीवली रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नालासोपारा टीमला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. गुन्हेगार कितीही चतुर असला तरी पोलिसांच्या नजरेतून तो कधीच सुटत नसतो. ही गोष्ट पुन्हा एकदा या घटनेवरुन अधोरेखित झाली. या हत्या प्रकरणात छोटा राजनचाही सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता सीबीआयकडे ताबा असलेल्या छोटा राजनला चौकशीसाठी पालघरला आणण्याची तयारी स्थानिक गुन्हे शाखेची चालली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Embed widget