एक्स्प्लोर

भुजबळांना जामीन मिळणार? 18 डिसेंबरला फैसला

भुजबळांच्या वतीने ते निर्दोष असल्याचा कोर्टात पुनरुच्चार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम 45 मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर 18 डिसेंबरला मुंबईतील पीएमएलए कोर्ट निर्णय सुनावणार आहे. शुक्रवारी या अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून, तर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं पीएमएलए कायद्यातील कलम 45(1) असंविधानिक ठरवत नुकतच रद्द केल्याने भुजबळांच्या जामिनाची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळांच्या वतीने ते निर्दोष असल्याचा कोर्टात पुनरुच्चार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम 45 मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे. "गेले 21 महिने आपण जेलमध्ये आहोत, पासपोर्ट ईडीकडे जमा आहे. त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा.", अशी विनंती भुजबळांच्या वतीने कोर्टाला करण्यात आली आहे. दरम्यान, कालच पीएमएलए कोर्टात छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर सुरु असलेल्या सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद 8 डिसेंबर रोजी म्हणजे आजच पूर्ण करण्याचे आदेश न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी दिले होते. काल कोर्टात काय झालं होतं? काल झालेल्या सुनावणीत ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी भुजबळांच्या जामिनाला विरोध करतच आपला युक्तिवाद सुरु केला होता. एकूण 847 कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील केवळ 29 कोटींचा हिशेब देण्यात आरोपी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे बाकीचा सारा पैसा गेला कुठे हा प्रश्न अनुत्तरीत आहे आणि हिशेब लागलेल्या 29 कोटींतही सर्व देवाणघेवाण ही कुटुंबियांच्याच मालकीच्या कंपन्यात अथवा बोगस तयार करण्यात आलेल्या कंपन्यांत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करत राष्ट्रीय संपत्तीचा अपहार आरोपींनी मिळून केल्याचा दावा ईडीच्यावतीनं करण्यात आला. संबंधित बातम्या : भुजबळांना जामीन मिळण्याच्या आशा पल्लवीत, मात्र... भुजबळांवरील सुनावणीदरम्यान कोर्टात शिवसेना आमदार उपस्थित

महत्त्वाच्या बातम्या

Food Safety Action : 'ईटक्लब ब्रँड्स'वर FDA ची मोठी कारवाई; गोरेगाव आउटलेटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित
'ईटक्लब ब्रँड्स'वर FDA ची मोठी कारवाई; गोरेगाव आउटलेटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित
Magathane Dahi Handi : मुंबईतील मराठी शाळा टिकवण्यासाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी! माघाठाण्यात रंगणार गोविंदांचा थरार
मुंबईतील मराठी शाळा टिकवण्यासाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी! माघाठाण्यात रंगणार गोविंदांचा थरार
Ashfaque Bakery FDA Action : तुकाराम मुंढेंचे 'ऑपरेशन भेसळ क्लियर' सुरूच, चेंबूररमधील प्रसिद्ध 'अशफाक बेकरी'वर धाड, अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित करण्याचे आदेश
तुकाराम मुंढेंचे 'ऑपरेशन भेसळ क्लियर' सुरूच, चेंबूररमधील प्रसिद्ध 'अशफाक बेकरी'वर धाड, अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget