एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळांना डिस्चार्ज, रुग्णालयातून घराकडे रवाना
छगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून निघाल्यावर छगन भुजबळ सांताक्रुझमधून त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“स्वादुपिंडाच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. आराम करेन. अजून पूर्ण बरा झालो नाही.”, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, पहिल्यासारख्ये सक्रीय राहता येणार नाही, अशी अट डॉक्टरांनी घातल्याचेही भुजबळांनी सांगितले.
पुढील उपचाराबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना जामीन मिळाला, तरी ते रुग्णालयातच होते. कारण त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर भुजबळांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
भुजबळांवर पुढील उपचार 'लीलावती'त?
दरम्यान, छगन भुजबळ यांच्यावर यापुढे लीलावती रुग्णालयता उपचार होण्याची शक्यता आहे. दोन-तीन दिवस घरी आराम करुन, मग भुजबळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतील, अशी माहिती मिळते आहे.
भुजबळ आता थेट मैदानात, जाहीर भाषणाची तारीख ठरली! राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक प्रकरणात दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर भुजबळ थेट मैदानातच उतरणार आहेत. पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहेत. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे भाषण करणार आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे. पंकज भुजबळ-उद्धव ठाकरे भेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट झाली. छगन भुजबळ यांनीच पंकज भुजबळ यांना 'मोतश्री'वर जाण्यास सांगितले होते. सुमारे 15 मिनिटं उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची भेट झाली. या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने, पंकज भुजबळ पेढे घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यास गेले होते. छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी पंकज भुजबळ यांना दिला. भुजबळ सुटले! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केलं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती. 14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळांना अटक पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च 2016 रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.पूर्णपणे बरा झालेलो नाही. गरज पडली तर पुढील उपचार घ्यावी लागतील : छगन भुजबळ @Marathi_Rash pic.twitter.com/hAjsEnc3ge
— ABP माझा (@abpmajhatv) May 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement