मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांचं वर्णन 'नया है वह' या शब्दात केलं आहे. तसंच अजित पवार नाराज नसल्याचंही भुजबळ म्हणाले. पवार कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी फटकारलं होतं. "पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही ", असं शरद पवार म्हणाले होते.


याविषयी आज (13 ऑगस्ट) छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितलं त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचं झालं तर 'नया है वह'.


तसंच पवार कुटुंबात वाद नसल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत. कुटुंबात एकमेकांना सुचवू शकतात."


'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट


पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार


शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."


पार्थ पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.


आदित्य ठाकरेंचा सुशांत प्रकरणाशी संबंध नाही: भुजबळ
"सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे," असं छगन भुजबळ म्हणाले.


संबंधित बातम्या


'जय श्री राम' म्हणत पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणतात...


पार्थ पवार गृहमंत्र्यांच्या भेटीला; सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी


फोडाफोडीच्या राजकारणाला कोणाची फूस? पार्थ पवार यांचा पारनेर दौरा चर्चेत


Chhagan Bhujbal on Parth Pawar | 'नया है वह', छगन भुजबळ यांच्याकडून पार्थ पवार याचं वर्णन