एक्स्प्लोर

भुजबळ जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टात!

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून कैदेत आहेत.

मुंबई : छगन भुजबळ यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे. पीएमएलए कोर्टानं फेटाळलेल्या जामिनाला भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलं. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या वतीने ते निर्दोष असल्याचा पुनरूच्चार करत सर्वोच्च न्यायालयानं मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम 45(1) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेले 21 महिने आपण जेलमध्ये आहोत, पासपोर्ट ईडीकडे जमा आहे. त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्या वतीने कोर्टाला करण्यात आली होती. मात्र पीएमएलए कोर्टाने भुजबळांचा जामीन अर्ज फोटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्याने अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे, अस निरीक्षण नोंदवलं होतं. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टानं तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Embed widget