एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चकाचक विमानासमोर नारळ फोडला, पूजा झाली, विमान उडालं, आणि...
एखादं काम विनाव्यत्यय पूर्ण व्हावं, यासाठी पूजा करण्याची प्रथा समाजात रूढ आहे. त्याप्रमाणे या विमानाचीही उड्डाणापूर्वी नारळ फोडून पूजा केली होती.
मुंबई : घाटकोपरमध्ये भर वस्तीत विमान कोसळून विमानातील चार जणांसह एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विमानाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. जुहूवरून उड्डाण घेण्यापूर्वी या विमानाची पूजा केल्याचे फोटो समोर आले आहेत.
एखादं काम विनाव्यत्यय पूर्ण व्हावं, यासाठी पूजा करण्याची प्रथा समाजात रूढ आहे. त्याप्रमाणे या विमानाचीही उड्डाणापूर्वी नारळ फोडून पूजा केली होती.
हे विमान अनेक दिवसांनी हवेत झेपावणार होतं. त्यामुळेच श्रद्धेपोटी या विमानाची पूजा करुन, ते चाचणीसाठी सज्ज केलं होतं.
मात्र उड्डाणानंतर काही वेळातच ते जमिनीवर कोसळलं.चाचणीसाठी या विमानाचे जुहू हेलीपॅडवरून उड्डाण करण्यात आले होते.
अपघाताचे नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पण असे अपघात रोखण्यासाठी पूजा नाही तर तांत्रिक सुसज्जता आणि मानवी दक्षता योग्यपणे घेतली जाणं गरजेचं आहे, हेच या घटनेतून अधोरेखित झालं आहे.
दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं.
संबंधित बातम्या :
घाटकोपर दुर्घटनेतलं आणि मुख्यमंत्र्यांचं 'ते' हेलिकॉप्टकर एकाच कंपनीचं
हजारोंचे प्राण वाचवले, महिला वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं
जुहूवरुन उड्डाण ते घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement