Chandrashekhar Bawankule on Vijay Wadettiwar : उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने ॲड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर मुंबई हल्ला प्रकरण (Mumbai Blast Case) चर्चेत आले आहे. यावरून सध्या आरोपांच्या फैरी सुरु आहेत. 


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. ती गोळी संघाशी (आरएसएस) संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले. या देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 


विजय वडेट्टीवारांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी


चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर पोस्ट शेअर करत विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात  म्हटले आहे की,  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. 


काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? 


निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Vijay Wadettiwar : धर्मरावबाबा आत्रामांच्या दाव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले, सत्तेसाठी कुठेही जायला मी...


Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका