मुंबई: मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे बेस्ट प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाजम्बो ब्लॉकचा परिणाम शुक्रवारी सकाळपासूनच सर्व रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाच्या (BEST Bus) वतीने बस सोडल्या गेल्या आहेत. नियोजित वेळापत्रकाशिवाय, तसेच जशी गरज भासेल त्याप्रमाणे प्रत्येक आगारातून गाड्या सोडल्या जातील. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होणार नाही. मात्र, संपूर्णपणे लोकल ट्रेनवर (Mumbai Local Train) अवलंबून असलेल्या मुंबईकरांना बेस्टच्या या सुविधेचा कितपत फायदा होणार, याबाबत शंकाच आहे. याशिवाय, ठाणे आणि कल्याण परिसरात एसटी महामंडळाकडूनही प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. 


बेस्ट प्रशासनाकडून कोणत्या भागांमध्ये अतिरिक्त बसेसची व्यवस्था?


CSMT ते दादर स्थानक 4 बसेस 80 फेऱ्या 
कुलाबा आगर ते भायखळा स्थानक 4 बसेस 80 फेऱ्या 
कुलाबा अगर ते वडाळा स्थानक 4 बसेस 72 फेऱ्या 
कुलाबा आगर ते वडाळा स्थानक चार बसेस 30 फेऱ्या 
CSMT  ते धारावी आगार 5 बसेस 30 फेऱ्या 
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षा नगर पाच बसेस 20 फेऱ्या 
बॅकबे आगार ते एम एम आर डी ए वसाहत माहुल 5 बसेस 20 फेऱ्या 
कुलाबा आगार ते खोडदाद सर्कल पाच बसेस 30 फेऱ्या 
सी एस एम टी ते भायखळा स्थानक तीन बसेस 24 फेऱ्या 
राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क पाच बसेस 20 फेऱ्या 
सीएसएमटी ते भायखळा स्थानक पाच दुमजली बसेस 40 फेऱ्या 
अँटॉप हिल ते वीर कोतवाल उद्यान पाच बसेस 40 फेऱ्या


बेस्टच्या बसेस फक्त कागदावर की रस्त्यावरही धावणार?


मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या बसेस फक्त कागदार राहणार की रस्त्यावरही धावणार, हे पाहावे लागेल. मुंबईत बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बसगाड्या सोडल्याने प्रवाशांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु, उपनगरात बेस्ट प्रशासनाने फारशी तसदी घेतलेली दिसत नाही. उपनगरातील भागात बेस्टच्या अतिरिक्त बसेस देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सकाळच्या वेळेत रेल्वे नसली तरी बस मिळेल, या अपेक्षेने घराबाहेर  पडलेल्या प्रवाशांची निराशा होताना दिसत आहे. 


अंबरनाथ आणि बदलापूरच्या प्रवाशांचं काय होणार?


मध्य रेल्वेने 63 तासाचा जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि सीएसटी या स्टेशन दरम्यान रेल्वे रुळांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सकाळच्या वेळेत कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ या स्टेशनवर चाकरमान्यांचे हाल होताना दिसले नाहीत. या स्टेशनवरती प्रवाशांची गर्दी दिसून येत नव्हती. मात्र, काही वेळाने या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तेव्हा काय घडणार, हे पाहावे लागेल.


प्रवाशांच्या मदतीला एसटीची बस सेवा


मध्य रेल्वेवर  शुक्रवार, शनिवार आणि रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे , या काळात लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी मदतीला धावली आहे. एसटी महामंडळाने ब्लॉक काळात जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आगारातून 26 गाड्या तर ठाणे आगारातून 24 गाड्या या सोडण्यात येणार आहेत. सकाळपासूनच एसटी महामंडळाच्या या बसेस प्रवाशांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत. 


आणखी वाचा


मुंबईकरांचे 'मेगा'हाल; जम्बो ब्लॉकमुळे 20 मिनिटांनी एक ट्रेन; ठाणे, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी


प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आजपासून मध्यरेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; लोकलच्या तब्बल 930 फेऱ्या रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार?