Navi Mumbai Hoarding : नवी मुंबईतील होर्डिंग्जवर कारवाईकरता हायकोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सिडकोच्या नोटीशीविरोधात कोर्टात आलेल्या जाहिरात कंपन्यांना महिन्याभरात होर्डिंग्ज उतरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिडकोची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करत याचिका दाखल झाल्या होत्या. पण सिडको मात्र कारवाईवर ठाम राहिली. सिडकोनं होर्डिंग्जबाबत आपली पॉलिसी हायकोर्टात सादर केल्यानंतर याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला.
याचिकाकर्त्यांना नव्यानं परवानगीकरता सिडकोकडे अर्ज करण्याची मुभा हायकोर्टाकडून देण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. सिडकोनं आपल्या कार्यक्षेत्रातील 40 हून अधिक होर्डिंग्जवर कारवाईची नोटीस बजावली आहे.
खालील होर्डिंग्ज तात्काळ काढा अन्यथा आम्ही या होर्डिंग्ज काढू व त्या खर्च कंपनीकडून वसुल केला जाईल, असा इशारा सिडकोकडून देण्यात आलाय. ही नोटीस रद्द करण्याकरता कंपन्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पम कोर्टाकडून सिडकोच्या बाजूने निकाल देण्यात आलाय. तसेच तात्काळ होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देवांगी आऊटडोअर एडव्हर्टायझिंग
नवी मुंबई परिसरात कंपनीच्या सात होर्डिंग्ज आहेत गावकऱ्यांच्या जाेगत या होर्डंग्ज असून त्यांना या जागेचं भाडं दिलं जातं. यासाठी ग्रामपंचायतची रितसर परवानगी घेतली आहे.
फ्रेंड्स एडव्हर्टायझिंग
या कंपनीनं साल 2023 मध्ये कोल्ते इथं होर्डिंग उभे केलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने होर्डिंगचा विमा काढला आहे. ज्या जागेत हे होर्डिग उभं आहे, त्याचे रितसर भाडं दिलं जातं. कंपनीनं नुकतंच होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिटही केलेलं आहे.
आऊटडोअर मंत्रा
या कंपनीची रायगडमध्ये साल 2019 पासून आठ होर्डिंग्ज आहेत. गावकऱ्यांच्या जागेत या होर्डिंग्ज असल्यानं त्यांना याचा मोबदला दिला जातो. होर्डिंग्ज उभी करण्यासाठी ग्रामपंचायतकडून रितसर परवानगी घेतलेली आहे.
सृष्टी कम्युनिकेशन
नवी मुंबईत या कंपनीचं एक होर्डिंग आहे. आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन हे होर्डिंग्ज उभे केलेलं आहे.
र्व्हच्युल मीडिया
नवी मुंबईत कंपनीचं साल 2019 पासून होर्डिंग आहे. सर्व परवानग्या घेऊन हे होर्डिंग लावण्यात आलेलं असतानाही ते 24 तासात काढण्याची सिडकोने दिलेली नोटीस बेकायदा असल्याचा कंपनीचा दावा.