Mumbai Local Jumbo Mega Block Updates: मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (Thane Railway Station) आणि सीएसएमटी स्थानकांवर (CSMT Railway Station) एकाच वेळी महामेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिनही दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल रद्द केल्या जाणार आहेत, तर या तीन दिवसांत एकूण 72 लांब पल्यांच्या गाड्या देखील रद्द असतील. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. मुंबईत बेस्ट तर ठाण्यात टीएमटी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
काल रात्रीपासून ठाण्यात 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू झाला असून रविवारी दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं पर्यायी सुविधा म्हणून अरिक्त बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
पुढचे तीन दिवस चाकरमान्यांसाठी जिकरीचे
पुढचे तीन दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठे जिकरीचे असणार आहेत. कारण आज शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून मध्य रेल्वेवरील महाजम्बो मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येनं स्त्री, पुरुष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून विविध यंत्रणांसोबत कामाला सुरुवात झाली आहे. तब्बल 63 तासांचा हा मेगाब्लॉक असून रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील 5 आणि 6 फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यादरम्यान तब्बल 930 लोकल गाड्या रद्द करण्यात येणाऱ्या आहेत. त्यामुळे 161 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉकदरम्यान ठाणे स्थानकावरुन कशा धावतील गाड्या?
आज सकाळी ठाणे स्थानकावर पेवर ब्लॉकच काम सुरू करण्यात येणार आहे. फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरुन सगळी लोकल ट्रेन अप आणि डाऊन मार्गे स्लो ट्रॅकनी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरून धावणार आहेत. तसेच, मेल एक्सप्रेस गाडी 6 आणि 7 वर अप आणि डाऊन मार्गावर धावणार आहे. लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील तीन दिवस 63 तासांच्या मेगाब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागणार आहे.
ठाणे स्थानकांतील कोणत्या कामासाठी मेगाब्लॉक?
ठाणे स्थानकात सुरू झालेल्या मेगा ब्लोकचे काम प्रगतीपथावर आहे, 5 नंबर फलाताची रुंदी वाढवण्याचे काम करण्यात येत आहे, त्यासाठी आधी मुंबईहून कल्याण कडे जाणारा जलद मार्गिकेचा रुळ बाजूला सरकवणं गरजेचं होतं, रात्रीपासून आतापर्यंत हे काम पूर्ण करण्यात आलं आहे, रुळ एका बाजूला सरकवण्यात आले आहेत, आता रुळावरील ओव्हर हेड वायर, बाजूची सिग्नल यंत्रणा, पॉइंट्स सरकवले जातील, रुळाच्या खाली खडी टाकून ट्रॅक मजबूत केला जाईल, त्यानंतर आधी पासून बनवून ठेवण्यात आलेले प्री कास्ट ब्लॉक्स आणून नवीन तयार झालेल्या जागेवर ठेवण्यात येतील, अश्याप्रकरे रुंदी वाढवली जाईल,
सध्या ठाणे स्थानकात 2 नंबर म्हणजे मुंबईहून कल्याण कडे जाणारा धीमा मार्ग आणि कल्याण हून मुंबईकडे जाणाऱ्या 6 नंबर जलद मार्ग सुरू आहे, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या 7 आणि 8 नंबर फलाटावर वळवण्यात आल्या आहेत, 5 नंबर म्हाजेच कल्याण कडे जाणारा जलद ट्रक आणि मुंबईकडे जाणार धीम्या मार्ग सध्या बंद आहे.
मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुभा
मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 63 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण होत आहे. त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांची रजा कापली जाणार नाही, असं निर्णय घेण्यात आला आहे.