मुंबई: 'अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.' असा निकाल देत आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानला धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या या निर्णयामुळे भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. या निर्णयानंतर मुंबईसह संपूर्ण देशात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


या निकालानंतर कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतील घराबाहेरही फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या निर्णयानं कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला. आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी याबाबतचा निर्णय दिला.

आंतरराष्ट्रीय कोर्टाने काय म्हटलं?

  • अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : आंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • कुलभूषण जाधव हेर आहेत की नाही हे सिद्ध झालं नाही, कुलभूषण यांनी हेरगिरी केली हा पाकचा दावा टिकणारा नाही : आंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • कुलभूषण जाधव हे हेर असल्याचे अद्याप अस्पष्ट, पाकचे पुरावे पुरेसे नाहीत – आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • 1977 च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती – कोर्टाचा पाकला झटका


 

  • कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांकडून मान्य : आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं -आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळायला हवी : आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे : आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली : आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

  • पाकने कुलभूषण जाधवांवर हेरगिरीचा आरोप केला आहे, तर भारताने जाधवांना भेटू न दिल्याचा दावा केला आहे : कोर्ट


 

  • भारताकडून कुलभूषण जाधवांच्या फाशीच्या शिक्षेला वारंवार विरोध : आंंतरराष्ट्रीय कोर्ट


 

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
सुनावणीदरम्यान भारताने पाकिस्तानवर व्हिएन्ना करारचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.

कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या:

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : कोर्ट

कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला

पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा