एक्स्प्लोर
EXCLUSIVE : असा घडला स्फोट! डोंबिवली स्फोटाचं सीसीटीव्ही फूटेज

डोंबिवली (मुंबई) : डोंबिवली एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीत झालेल्या शक्तीशाली स्फोटात 5 जण ठार तर 140 हून अधिक जण जखमी झाले. या स्फोटादरम्यानचे सीसीटीव्ही फूटेज ‘एबीपी माझा’च्या हाती लागले आहेत. स्फोटाठिकाणी धुराचे लोट आणि त्यानंतर नागरिकांची धावपळ सुरु असल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे. प्रोबेस कंपनीमधील हा सीसीटीव्ही फूटेज आहे.
आज सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी एमआयडीसीतल्या प्रोबेस केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊ तीन मजली कंपनी कोसळली. त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या स्फोटांचे हादरे अख्ख्या डोंबिवलीत जाणवले. शिवाय 2 किलोमीटर परिघातल्या घरांच्या काचा फुटल्या, भिंतींना तडेही गेले.
स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आणि जखमींना बाहेर काढलं. जखमींवर डोंबिवलीतल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
पाहा सीसीटीव्ही फूटेज :
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























