मुंबई : व्यंगचित्रांसाठी राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अमित शहा यांचा चेहरा कार्टूनसाठी चांगला आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांची मुलाखत अंबरीश मिश्र यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. सध्याच्या व्यंगचित्रकारांकडे राजकीय अभ्यास नाही, ड्रॉइंग पॉवरफुल हवं, राजकीय अभ्यास हवा, विनोदाचं अंग उपजत हवं. या तीन गोष्टीतून व्यंगचित्रकला तयार होते, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी दिवसांतून सहा ते सात तांस व्यंगचित्रं काढायचो. माझा मुलगा अमित ठाकरे उत्तम चित्रं काढायचा. त्याला चित्राची आवड आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज्यात घडलं ते दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय : राज ठाकरे


यावेळी ते म्हणाले की, चित्रं आणि चित्रपट कसा पाहावा याचा अभ्यासक्रमात समावेश असायला हवा. चित्रकार म्हणून एमएफ हुसैन मला खूप आवडतात. त्यांनी वाद उगाच वाढवून घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका मिनिटाच्या आत एमएफ हुसैनचं कॅरिकेचर केलं होतं, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी. रिअलिस्टिक ड्रॉइंग शिकल्यावर मग व्यंगचित्रकला येते. ज्या देशात खजुराहो सारखं शिल्प निर्माण होतं. त्या देशात अश्लीलतेचा बाऊ केला जातो, असंही राज ठाकरे म्हणाले.

बोर्डात पहिला आलेल्या मुलांचा सत्कार करायला जात नाही
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी पदवीधर नाही. त्याने मला काही फरक पडत नाही. मला दहावीला 37 टक्के मार्क होते. मी दहावीला बोर्डात पहिला आलेल्या मुलांचा सत्कार करायला जात नाही. भारतीय लोकशाहीमुळं 37 टक्केवाला बोर्डात पहिला आलेल्यांचा सत्कार करतो. मला अॅनिमेटर व्हायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न

राज ठाकरेंवर 'गांधी' चा प्रभाव
राज ठाकरे यावेळी म्हणाले की, मला गांधी चित्रपट मला आजही आवडतो, प्रत्येक वेळेला तो नवं काही शिकवतो. गांधी चित्रपटानंतर मी भारावलो. तो चित्रपट प्लाझाला 30-32 वेळा पाहिला असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी सखोलपणे गांधींवरील साहित्य वाचायला सुरुवात केली. गांधी सिनेमा पाहिल्यावर शिवाजी महाराजांवर असा चित्रपट करावा असं वाटू लागलं. मात्र तीन तासांत शिवाजी महाराजांवर सिनेमा करणं कठीण आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे