एक्स्प्लोर
Advertisement
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई: राज्य मंत्रिमंडळात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अहमदनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय, तसेच उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षावरुन 60 वर्षे करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.
- उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय.
- ग्राहकांसाठीच्या विविध शुल्क आकारणीत सुसंगती यावी आणि वीज शुल्क वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम 1958 रद्द करून त्याऐवजी महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक 2016 च्या प्रारुपास मान्यता.
- सर्वांसाठी घरे या महत्त्वाकांक्षी संकल्पाच्या पूर्तीसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती.
- अहमदनगर जिल्ह्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय.
- महाराष्ट्र विधानपरिषदेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन 8 जुलै रोजी घेण्याचा निर्णय. (सभापती निवडीसाठी हे अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.)
- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय या संस्थांना नागपूर जिल्ह्यात मंजूर केलेल्या जागेमध्ये व क्षेत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement