मुंबई : मुंबईत पिक अवरमध्ये अवजड वाहनांना बंदी करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला मुंबई बस मालक संघटनेनं विरोध दर्शवला आहे. मुंबई शहरात खासगी बससेवा पुरवणाऱ्या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अवजड वाहनांवरील बंदीबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त पडसलगीकरांची भेट घेतली.
“अवजड वाहनाबाबत मी फक्त सूचना केल्या होत्या, मात्र त्याच्या बंदीच्या अंमलबजावणी बाबत मला नाहीत नाही” असं भेटी दरम्यान पोलीस आयुक्तांनी मुंबई बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान आम्ही ही बंदी लवकरात लवकर मागे घेऊ, असं आश्वासन पोलिस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे सह आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याच बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
मात्र ,जे आश्वासन दिलंय ते जोपर्यंत पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत आम्ही 19 आणि 20 तारखेच्या संपावरवर ठाम आहोत असंही खासगी बस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मुंबईत मेट्रोचं सुरु असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच लक्षात घेत मुंबईच्या वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अवजड वाहनांची गर्दी आणि वाहनांमुळे होणारा ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणूनच सध्या दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
अवजड वाहनांवरील बंदीसाठी एक विशिष्ट वेळ ठेवण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश नसेल.
एसटी, बेस्ट बस, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बस, पाणी-दूध-भाज्यांसारख्या अत्यावश्यक सेवा किंवा पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारी वाहनं, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्यांना यातून सूट देण्यात आली आहे.
मुंबईत पिक अवर्समध्ये अवजड वाहनांवरील बंदीला बस संघटनेचा विरोध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2017 04:31 PM (IST)
मुंबई शहरात खासगी बससेवा पुरवणाऱ्या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अवजड वाहनांवरील बंदीबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त पडसलगीकरांची भेट घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -