एक्स्प्लोर

Building Collpse : उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखालून 17 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं. जखमींना उल्हासनगरच्या सेन्ट्रल रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

कल्याण : उल्हासनगरमध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळत आल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेमुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील मोहिनी पॅलेस इमारतीत आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकानं होती. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. अक्षरशः पट्ट्यासारखा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, तो थेट जमिनीवर आला. या घटनेनंतर अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. 

या इमारतीतील 17 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं. जखमींना उल्हासनगरच्या सेन्ट्रल रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ व टीडीआरएफने ढिगाऱ्याखाली दबलेल्या 5 जणांना मृतावस्थेत बाहेर काढलं. तर एक जण अजून मलब्याखाली असल्याची माहिती असून त्याचं शोधकार्य सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मृतांची नावे  

  1. मॉन्टी पराचे -12 वर्ष 
  2. संध्या डोटवालन- 46 वर्ष 
  3. हरेश डोटवाल-  47 वर्ष 
  4. ऐश्वर्या डोटवाल -17 वर्ष 
  5. सावित्रीबाई पारचा - 58 वर्ष

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची शासकीय मदत दिली जाणार असून जखमींवर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच कमी एफएसआयच्या समस्येमुळे उल्हासनगरात क्लस्टर योजना लागू होऊ शकत नसली, तरी पुनर्विकास आणि नियमितीकरण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती खासदार शिंदेंनी दिली. तर उल्हासनगरातील सर्व धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

 

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Embed widget