एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
भिवंडीत पुन्हा एक इमारत कोसळली, दोन जण जखमी
![भिवंडीत पुन्हा एक इमारत कोसळली, दोन जण जखमी Building Collapsed In Bhivandi भिवंडीत पुन्हा एक इमारत कोसळली, दोन जण जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/08142633/thane-Slab-collapse-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंडीः भिवंडीत इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू होऊन 24 तास उलटत नाहीत, तोवरच आणखी एका इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. नवा बाजार परिसरातील इमारतीचा स्लॅब आज सकाळी कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.
सुदैवाने या अपघाताची तीव्रता कमी असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्रकारानंतर पालिका प्रशासनाने त्वरित इमारतीच्या पाडकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भिवंडीतील हनुमान टेकडी नावाची दुमजली इमारत काल सकाळी कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेने ही इमारत अगोदरच धोकादायक म्हणून घोषित केली होती.
संबंधित बातमीः भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा आठवर
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion