मुंबई: मुंबईकरांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यात एक मोठा त्रास तो म्हणजे वाहतूक कोंडी. दररोज मुंबईकरांचा वेळ प्रवासातच वाया जातो, त्या गाड्या पार्क करण्यासाठी जागासुद्धा उपलब्ध नसतात. या अडचणीवर बेस्टने एक तोडगा काढला आहे. ही रोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बेस्ट त्यांच्या 27 बस डेपोवर पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारले होते. यावर मुंबईकरांचा संमिश्रित प्रतिसाद होता, काहींनी याचं समर्तन केलं तर अनेकांनी विरोध.  मुंबईमध्ये होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून ज्यादा दंड आकरण्याचं सांगितलं गेलं होतं. याच वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून आता बेस्ट पुढे सरसावलं आहे. मुंबईतील बेस्टच्या तब्बल 27 बस डेपों च्या जागा खाजगी पार्किंगसाठी देण्यात येणार आहेत.

मुंबईतल्या पार्किंगच्या समस्येवर 'बेस्ट' उपाय, बेस्टच्या 27 डेपोमध्ये खाजगी वाहनांना पार्किंगची मुभा


मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला बसआगार आणि बसस्थानकांमध्ये खाजगी वाहनांचे पार्किंग 'पे अँड पार्क' योजनेअंतर्गत करण्याची सूचना केली होती, तसेच ‘मुंबई पार्किंग अथऑरिटीने’ पार्किंगचे दर कमी ठेवण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे लोकांचा 'पे अँड पार्क'ला चांगला प्रतिसाद मिळेल.

बेस्टच्या ताफ्याता 3000 पेक्षा जास्त बसेस आहेत ज्यांच्या पार्किंग नंतर उर्वरित जागेवर ही पे अँड पार्क सुविधा असणार आहे. बेस्टच्या बसेसला यामुळे पार्किंगसाठी कुठलीही अडचण येणार नाही.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणावर पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक डेपोला पार्किंगचे नियोजन आणि देखरेख करण्याची जबाबदारी बेस्ट ने दिली आहे. या पार्किंग सुविधेमुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न सुटणार असून बेस्टच्या बसेस ज्या रस्त्यावर धावतात त्यांना सुद्धा वेग मिळेल आणि रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे.

बेस्ट डेपोवरील पार्किंगसाठीचे दर कसे असणार आहेत?

3 तासापर्यंतचे दर

दुचाकी- 20 रुपये

तीन चाकी/ चार चाकी - 30 रुपये

रिक्षा / टॅक्सी - 30 रुपये

ट्रक / टेम्पो - 55 रुपये

बस - 60 रुपये

6 तासांपर्यंतचे दर

दुचाकी - 25 रुपये

तीन चाकी/ चार चाकी - 40 रुपये

रिक्षा / टॅक्सी - 40 रुपये

ट्रक / टेम्पो - 90 रुपये

बस - 95 रुपये

12 तासांपर्यंतचे दर

दुचाकी - 30 रुपये

तीन चाकी/ चार चाकी - 70 रुपये

रिक्षा / टॅक्सी - 70 रुपये

ट्रक / टेम्पो - 165 रुपये

बस - 175 रुपये

12 तासांपेक्षा जास्तचे दर

दुचाकी - 35 रुपये

तीन चाकी/ चार चाकी - 80 रुपये

रिक्षा / टॅक्सी - 80 रुपये

ट्रक / टेम्पो - 205 रुपये

बस - 215 रुपये

12 तासांठीचे मासिक दर

दुचाकी - 660 रुपये

तीन चाकी/ चार चाकी - 1540 रुपये

रिक्षा / टॅक्सी - 1540 रुपये

ट्रक / टेम्पो - 3630 रुपये

बस – 2000 रुपये

24 तासांसाठी मासिक भाडं

दुचाकी - 1320 रुपये

तीन चाकी/ चार चाकी - 3080 रुपये

रिक्षा / टॅक्सी - 3080 रुपये

ट्रक / टेम्पो - 7260 रुपये

बस – 3700 रुपये