एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात झोपाळ्याचा फास लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

नालासोपारा (पालघर) : तुळींज परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाचा झोपाळ्यात खेळताना झोपाळ्याचा फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत. नालासोपारा पूर्वेला न्यू आकांक्षा-2 या सोसायटीत डी विंगमध्ये राहणाऱ्या वाघेला कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. यशोदा वाघेला या आपल्या पतीला सोडून आंकाक्षा-2 या सोसायटीत आपला भाऊ महेश वाघेला याच्याकडे दोन मुलांसह राहात होत्या. यशोदा या कांदिवली येथील एका रुग्णालयात काम करतात. सोमवारी यशोदा आणि त्यांचा भाऊ हे दोघेही कामावर निघून गेले होते. घरात यशोदा यांचा 11 वर्षांचा मुलगा मयूर वाघेला आणि 12 वर्षांची मुलगी निशा वाघेला हे दोघे बहीण-भाऊ होते. हॉलच्या दोन्ही भिंतीला लोखंडी रॉडवर चादरीच्या साहय्याने झोपाळा बांधला होता. मयूर या झोपाळ्यावर नेहमीप्रमाणे खेळत होता. अचानक संध्याकाळी साडेचार-पाचच्या दरम्यान झोपाळ्याचा मयूरच्या गळ्यावर फास बसला आणि निशा आणि मयूर तो सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना तो फास अधिकच घठ्ठ बसला. त्यात मयूरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story





















