एक्स्प्लोर

मंजुळा शेट्ये प्रकरणी आरोपींना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

आरोपींना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, ज्याचा मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यावर थेट परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी हायकोर्टात केला होता.

मुंबई : मंजुळा शेट्ये प्रकरणातील सर्व आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. या आरोपींना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, ज्याचा मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यावर थेट परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी हायकोर्टात केला होता. तसेच या खटल्यातील वैद्यकीय अहवाल आणि इतर कैद्यांचे जबाब आरोपींचा या प्रकरणातील सहभाग सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. अटक होऊन जवळपास दोन वर्ष उलटून गेली आणि खटला सुरु होऊन अनेक महिने उलटले तरीही खटल्यात फारशी प्रगती नाही. या कारणावरून आरोपींनी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी हे जामीन अर्ज फेटाळून लावले. भायखळा महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणात आरोपी असलेल्या जेल अधिक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 24 जून 2017 रोजी मंजुळा शेट्येला भायखळा कारागृहातील या महिला अधिकाऱ्यांनी किरकोळ कारणांवरून आमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी या सहा महिला अधिकारी अटकेत असून यांच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. मंजुळा शेट्ये या जेल वॉर्डनकडून काही अंडी आणि पावांचा हिळेब न लागल्यानं तिला नग्न करुन अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. ज्यात तिचा मृत्यू झाला. सुरवातीला हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न जेल प्रशासनानं केला होता. मात्र कारागृहातील कैद्यांनी याविरोधात आवाज उठविल्यानंतर हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget