BOMBAY HIGH COURT : टिपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यास बंदी आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल तरी ती पोलिसांची जबाबदारी, गरज असेल तर मिरवणूकीचा मार्ग बदल्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
जयंती जागेवरच साजरी करा, ही पुणे पोलिसांची सूचना चुकीची - उच्च न्यायालय
जयंती जागेवरच साजरी करा, ही पुणे पोलिसांची सूचना चुकीची असल्याचेही मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. संविधान दिनानिमित्त भारतरत्न मौलाना आझाद व टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्याकरता पुणे पोलिसांनी मनाई केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं आहे. परवानगी नाकारल्याबद्दल आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी आयोजकांना भेट देत मिरवणुकीचा मार्ग ठरवण्याची हायकोर्टाकडून सूचना केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यास बंदी आहे का?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल तरी ती पोलिसांची जबाबदारी, गरज असेल तर मिरवणूकीचा मार्ग बदल्याचे निर्देश
जयंती जागेवरच साजरी करा, ही पुणे पोलिसांची सूचना चुकीची - हायकोर्ट
संविधान दिनानिमित्त भारतरत्न मौलाना आझाद व टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्याकरता पुणे पोलिसांची मनाई
परवानगी नाकारल्याबद्दल आयोजकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी आयोजकांना भेट देत मिरवणुकीचा मार्ग ठरवण्याची हायकोर्टाकडून सूचना
याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबरपर्यंत तहकूब
इतर महत्त्वाच्या बातम्या