Marriage fraud : सध्या देशातील अनेक तरुणांची लग्न होणं कठीण झालं आहे. अविवाहित असलेल्या तरुणांचा आकडा मोठा आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षा, शेती करणाऱ्या लोकांवर सातत्याने कोसळणारं आर्थिक संकट त्यामुळे लोक मुलीला शेतकऱ्याच्या कुटुंबातही देण्यास नकार देताना दिसत आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावरुन प्रेम होण्याचा जमाना आहे. याशिवाय विवाह जुळवण्यासाठी अनेक अॅप देखील वापरले जातात. मात्र, सोशल मीडियावरुन झालेल्या प्रेमाने लग्न तर झालेच नाही. मात्र, तरुणाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. बीबीसीने याबाबतचं वृत्त दिलंय. 


दुबईहून लग्नासाठी आला पण विवाहस्थळी कोणीच नव्हतं


पंजाबमधील जालंधर शहरातील 28 वर्षीय तरुण इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेमात पडला. विशेष म्हणजे हा तरुण दुबईमध्ये काम करत होता. तीन वर्ष प्रेम प्रकरण सुरु असताना ऐन लग्नाच्या दिवशी आपली फसवणूक झाल्याचे त्याचा लक्षात आली आहे. दुबईवरुन तो विवाहस्थळाजवळ आला मात्र, तिथे वधू नव्हती किंवा मंडप देखील नव्हता. त्याची आर्थिक फसवणूक झाल्याचेही त्याला लक्षात आले. 


तीन वर्षांपासून तो पाहत असलेली लग्नाची स्वप्न...स्वप्नच राहिली


अधिकची माहिती अशी की, पंजाबमधील मोगा येथे 6 डिसेंबर रोजी दीपक नावाच्या तरुणाचे लग्न होणार होते. मात्र, तो लग्नासाठी पोहोचला तेव्हा विवाहस्थळावर कोणीच नव्हतं. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तो पाहत असलेली लग्नाची स्वप्न...स्वप्नच राहिली. त्याच्या लग्नाच्या इच्छेचा अक्षरश: चुराडा झाला. दीपक असं फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून तो नाकोदरमधील मरियाला गावातील गावचा राहिवासी आहे. 


दीपक हा दुबईत मजुरीचं काम करत होता. झालेल्या फसवणुकीबाबत बोलताना तो म्हणाला, लग्नाच्या ठरलेल्या तारखेला मी नातेवाईकांसोबत वरात घेऊन मी विवाहस्थळी पोहोचलो. त्याठिकाणी कोणीही दिसलं नाही. त्यामुळे मी नवरीला फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने फोन घेतला नाही. त्यानंतर तिने फोन बंद करुन टाकला. मनप्रीत कौर असं त्या मुलीचं नाव आहे. तिने 50 ते 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचेही दीपकने सांगितलं.  


इतर महत्त्वाच्या बातम्या


Gadchiroli Crime : स्वत:ची बंदुक हाताळताना 8 राऊंड फायर झाले, 3 गोळ्या छातीत घुसल्या, न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाने जीव गमावला


Suicide rates : आयुष्याच्या तारुण्यात अन् जबाबदारीच्या वयातही कर्त्या पुरुषांच्याच गळ्याला सर्वाधिक दोरी; WHO ची धक्कादायक आकडेवारी