एक्स्प्लोर

कमला मिल कंपाऊंडच्या मालकांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबईतील कमला मिल कम्पाउंड अग्नितांडव प्रकरणी मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला

मुंबई : मुंबईतील कमला मिल कम्पाउंडच्या मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 29 डिसेंबर 2017 रोजी घडलेल्या अग्नितांडव प्रकरणी अटकेत असलेल्या कमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक रमेश गोवानी आणि कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी यांना अखेर हायकोर्टानं बुधवारी जामीन दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हायकोर्टानं या जामीन अर्जावरील सुनावणी तातडीनं पूर्ण केली. सुट्टीकालीन न्यायालयाचं कामकाज पाहणाऱ्या न्यायमूर्ती व्ही.एल. अचलिया यांनी मंगळवारी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय बुधवारपर्यंत राखून ठेवला होता. कमला मिल अग्नितांडव प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली होती. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घडलेल्या दुर्घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा या दोघांनी आपल्या जामीन अर्जात केला होता. ही घटना घडली तेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो. तिथल्या दैनंदिन कामकाजाशी आपला काहीही संबंध नाही. या दोन्ही जागा पाच वर्षांच्या भाडेत्त्वावर दिलेल्या आहेत. या जागेत सुरु असलेल्या पब्ज-रेस्टॉरंटसाठीचे सर्व परवाने हे पालिका प्रशासनाने दिलेले आहेत. मद्यसेवनाचे परवाने राज्य सरकारने दिलेले आहेत. अग्निसुरक्षा संबंधिचा परवानाही मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा गोवानी आणि भंडारी यांनी केला होता. विशेष सरकारी वकिलांसह या दुर्घटनेत जखमी झालेल्या पीडीतांच्या वतीने या जामिनास विरोध करण्यात आला होता. या घटनेशी आपला संबंध नाही, असं सांगण्याचा याचिकाकर्त्यांना कोणताही अधिकार नाही, असा दावा यांच्या वतीनं करण्यात आला. त्याच कमला मिल कंपाऊंडमध्ये हाकेच्या अंतरावर या दोघांची कार्यालयं आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या अनियमितते संदर्भात यांनी काहीच माहिती नसणे, ही गोष्ट न पटण्यासाखी असल्याचा दावा करत सुरक्षेचे नियम पायदळी तुडवण्यात जागेचे मालक या नात्यानं यांचीही तितकीच जबाबदारी होती, असा आरोप सरकारी वकिलांकडून करण्यात आला होता. 29 डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील 'वन अबव' आणि 'मोजेस ब्रिस्टो' या रेस्टोबारना लागलेल्या आगीनंतर गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Central Railway : मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
Embed widget