एक्स्प्लोर

वीस आठवड्यांनंतर गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलांबाबत वकिलांनी शहानिशा करावी

गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलांबाबत वकिलांनी याचिकेमध्ये त्यांचा तपशीलही मोकळेपणाने सविस्तर द्यायला हवा, जेणेकरुन कोर्टाला परिस्थितीबाबत नेमकी माहिती मिळेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण हायकोर्टाने नुकतंच नोंदवलं आहे.

मुंबई : वीस आठवड्यांपेक्षा अधिक गर्भधारणेनंतर विविध कारणांसाठी गर्भपात करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाची दिशाभूल आणि गैरवापर होता कामा नये, याची खबरदारी वकीलांनी घ्यावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. कायदेशीर मुदतीनंतर गर्भपाताची परवानगी मागण्यासाठी न्यायालयात याचिका करणाऱ्या महिला कोणत्या सामाजिक परिस्थितीत असतात?, त्यांची कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती काय असते?, त्या नोकरदार असतात की गृहिणी असतात, की एकट्या असतात याचा कोणताही तपशील साधारणपणे याचिकेत दिलेला नसतो. याचिकादार महिला विवाहित आहे, की अन्य कोणत्या परिस्थितीतून आलेली आहे? न्यायालयात याचिका करण्याची वेळ तिच्यावर का आली?, याचीही पुरेशी माहिती याचिकेत दिलेलीच नसते. त्यामुळे वकिलांनी त्यांच्या याचिकांमध्ये याबाबतचा तपशीलही मोकळेपणाने सविस्तर द्यायला हवा, जेणेकरुन कोर्टाला परिस्थितीबाबत नेमकी माहिती मिळेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण हायकोर्टाने नुकतंच नोंदवलं आहे. वीस आठवड्यांनंतर जर गर्भवतीच्या जीवाला गंभीर धोका असेल, तर गर्भपाताला आमच्या परवानगीची गरज नाही - हायकोर्ट न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने 22 आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेला गर्भपाताची परवानगी देताना हे निरीक्षण नोंदवलं आहे. या प्रकरणात गर्भाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मूल जन्माला आल्यावर त्याच्यावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र संबंधित महिलेला आधीच एक अपत्य असून तिची घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च त्यांना परवडणार नाही, असं महिलेच्या वतीने सांगण्यात आलं होतं. या एकंदरीत परिस्थितीचा विचार करता वैद्यकीय अहवालावरुन या महिलेला कोर्टाने गर्भपाताची परवानगी दिली आहे. गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भपाताची परवानगी महिलांना देण्यात आलेली आहे. यापुढील कालावधीसाठी हायकोर्टाकडून परवानगी मिळणे सक्तीचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget