एक्स्प्लोर

अंधेरी, डीएन नगर ते मानखुर्द मेट्रो मार्गाच्या कामावर स्थगिती कायम

दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने याबाबतची सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली. एमएमआरडीएला दिलासा देण्यास न्यायालयाने तूर्तास नकार दिला.

मुंबई : मेट्रो रेल प्रशासनाला अनेक सरकारी परवानग्यांची आवश्यकता नसतानाही प्रशासनाने सर्व परवानग्या घेतल्या आहेत, असा दावा एमएमआरडीएने गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. न्यायालयाने एमएमआरडीएचा हा युक्तीवाद ऐकून घेतला असला तरी तूर्तास मेट्रो प्रशासनाला कोणताही दिलासा दिलेला नाही. उन्नत मार्गिकेसाठी खांब उभारण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी एमएमआरडीएची मागणी असलेल्या याचिकेवर कोणताही निर्णय न देता या कामावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. अंधेरी-डीएन नगर ते मानखुर्द या उन्नत स्वरूपात असलेल्या मेट्रो 2 बी च्या कामामुळे ध्वनी प्रदूषण होणार असून स्थानिकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मेट्रो 2 बीचे भुयारीकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट हाऊसिंग सोसायटी, गुलमोहोर एरिया वेलफेअर सोसायटी ग्रुप आणि नानावटी रुग्णालय या सर्वांच्यावतीने करण्यात आली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरूय. एमएमआरडीएच्या वतीने न्यायालयाने घातलेली स्थगिती लवकरात लवकर उठविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, परुंतु न्यायालयाने स्थगिती उठविण्यास नकार दिला. मेट्रो प्रशासनाला विविध परवानग्यांची आवश्यकता गरजेची नसतानाही मेट्रोने त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. वांद्रे येथील कांदळवनांच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभाग तसेच पश्चिम विभागात मेट्रोचे काम करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. मेट्रोरेलसाठी अग्निशमन विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र बांधकामास सुरुवात करण्यात आल्यानंतर या परवानग्या घेण्यात असल्याचा युक्तीवाद एमएमआरडीएने केला. दोन्हीबाजूकडील युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने याबाबतची सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Embed widget