मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ समुद्रात गस्त घालत असलेल्या पोलिसांना घेऊन जाणारी बोट बुडाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या बोटीत 6 पोलीस होते. काल रात्री ही घटना घडली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही बोट गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर बुडत होती. या घटनेत जीवरक्षक प्रतीक वाघे याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सहा पोलिसांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे या सहाही पोलिसांकडे लाइफ जॅकेट नसल्याचे समोर आले आहे.
दरवर्षी गिरगाव चौपाटीवर नववर्षाचे स्वागत गर्दी होते. या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांचे एक पथक या बोटीत होते. या बोटीचा वापर पोलिसांना गस्तीनौकेपर्यंत नेण्यासाठी केला जातो. मात्र, ही बोट रात्री साडे आठच्या सुमारास समुद्रात बुडाली. हा प्रकार लक्षात येताच जीवरक्षक प्रतीक वाघे बोटीच्या दिशेने मदतीसाठी गेला.
या दरम्यान पोलिसांची दुसरी गस्तीनौका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तिथे पोहोचली. त्यांनी जीवरक्षक प्रतीक वाघेच्या मदतीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यातील एक कर्मचारी जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आणखी एक मच्छीमार थर्माकोलच्या साहाय्याने तिथे पोहोचला होता. मात्र, यादरम्यान तो थकला होता. प्रतीक वाघेने त्या मच्छीमाराला देखील सुखरुप किनाऱ्यावर आणले.
गिरगाव चौपाटीजवळ बोट बुडाली, 6 पोलीस बचावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2019 01:15 PM (IST)
ही बोट गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर बुडत होती. या घटनेत जीवरक्षक प्रतीक वाघे याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सहा पोलिसांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे या सहाही पोलिसांकडे लाइफ जॅकेट नसल्याचे समोर आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -