Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत 5 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनातून मुंबई महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, पाणी कपातीच्या आदल्या दिवशीच आवश्यक असलेला पाण्याचा साठा ठेवावा, असंही सांगण्यात आलं आहे. 


मुंबई महापालिकेच्यावतीने पिसे-पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम केलं जाणार आहे. हे काम मंगळवार, 24 ते शुक्रवार, 27 मे या कालावधीत दररोज सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत असं 4 तास केलं जाणार आहे. 


या कामामुळे पिसे पांजरापूर संकुल येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे 'ए', 'बी', 'ई', 'एफ दक्षिण', 'एफ उत्तर', 'एल', 'एम पूर्व', 'एम पश्चिम', 'एन', 'एस' आणि 'टी' विभागात 5 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. या विभागातील रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.


दरम्यान, प्रामुख्यानं दक्षिण मुंबईतील कुलाबा (Culaba), कफ परेड (Cuffe Parade), नरिमन पॉइंट (Nariman Point), चर्चगेट (Churchgate), फोर्ट (Fort), क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि कुर्ला (Kurla), गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर या पूर्व उपनगरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :