मुंबई : मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. तूर्तास आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीत अडसर ठरण्याची चिन्हे आहेत. गेली दोन वर्षे मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. जल विभागाच्या खर्चामध्ये साधारण 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जल विभागाने पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीमध्ये 8 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा विचार जल विभागाच्या पातळीवर सुरू आहे. मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


गेली दोन वर्षे मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती. जल विभागाच्या खर्चामध्ये साधारण 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जल विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपट्टीत 8 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तरतूद करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिका सभागृह आणि स्थायी समितीने या तरतुदीला मंजुरी दिली. त्यामुळे प्रशासनाला थेट पाणीपट्टीमध्ये 8 टक्के दरवाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा आधार घेत पाणीपट्टीमध्ये 8 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा विचार जल विभागाच्या पातळीवर सुरू आहे.


मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत 2021 मध्ये संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढ होईल की नाही याबाबत साशंकता आहे. निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय घेतला जाणार की, नाही याबाबची चर्चा आता मुंबईकरांमध्ये सुरू आहे. दरम्यान, यासंबधीचा प्राथमिक प्रस्ताव महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर लेखा परीक्षण विभागाशी चर्चा करून यासंबधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या प्रस्तावाला आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे जल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणांमधून वाहून आणलेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. जलवाहिन्यांमधून मुंबईकरांच्या घरोघरी पाणी पोहोचवले जाते. धरणांमधून मोठ्या मुख्य जलवाहिन्यांमधून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून आणणे, पाण्यावर शुद्धकरणाची प्रक्रिया करणे, घरोघरी पाणी पोहोचवणे आदी कामांसाठी महापालिकेला मोठा खर्च येतो. मुंबईमधील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती, जल बोगद्यांची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती आदी कामांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागतो. मुंबईकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून काही भाग हा खर्च भागवण्यात येतो.